चाळिशीनंतरचे हाडांचे दुखणे

स्टियोपोरोसिस हा एक सर्वव्यापी आजार आहे. ज्यामध्ये हाडांच्या ठिसूळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. वाढत्या वयात फॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. सहज पडलं तरी काही लोक फ्रॅक्चर होतात. बदललेली जीवनशैली, अपौष्टिक अाहार, व्यायामाच्या अभावामुळे ‘स्टियोपोरोसिसचे प्रमाण वाढत चालले आहे.

स्टियोपोरोसिस हा एक सर्वव्यापी आजार आहे. ज्यामध्ये हाडांच्या ठिसूळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. वाढत्या वयात फॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. सहज पडलं तरी काही लोक फ्रॅक्चर होतात. बदललेली जीवनशैली, अपौष्टिक अाहार, व्यायामाच्या अभावामुळे ‘स्टियोपोरोसिसचे प्रमाण वाढत चालले आहे.
एका निरीक्षणानुसार भारतात जवळपास १० कोटी लोक ‘स्टियोपोरोसिस’ या आजाराशी झुंज देत आहेत. दरवर्षी यात २० टके वाढ होत आहे.या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार लवकर दिसून येत नाही. हाडाचा ठिसूळपणा वाढल्यावर याची लक्षणे दिसून येतात. चाळिशी पार केलेल्या महिलांमध्ये तसेच पुरुषांत हात-पाय दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘स्टियोपोरोसिस.’ या आजाराशी सामना करायचा असेल तर हाडांची काळजी कशाप्रकारे घ्यावी हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. हाडांचे दुखणे आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. पुरुषांपेक्षा महिलांना ही समस्या जास्त भेडसावते. मेनोपॉज वा वाढत्या वयासोबत हा आजार वाढण्याचा धोका जास्त संभवतो. महिलांची आधुनिक जीवनशैलीने युक्त दिनचर्या व अनियमित खाण्यापिण्याच्या सवयींमुळे या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शरीरात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे ’स्टियोपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साधारण वयाची ४५ गाठल्यानंतर या आजाराची सुरुवात होते, मात्र ६०-७० वयापर्यंत हा आजार जास्त त्रासदायक होतो.
स्टियोपोरोसिस या आजाराचे मुख्यत: दोन प्रकार पडतात : ‘स्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त प्रभाव मणका व हिप, मनगटाची हाडे यांवर असतो.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार
१) वयाची चाळिशी पार केलेल्या १0पैकी तीन पुरुषाला तर ३ पैकी एक स्त्री या आजाराला बळी पडलेली असते.

२)‘स्टियोपोरोसिस झालेल्या ५० टक्के लोकामध्ये व्हिटॅमिन्स डी ची कमतरता दिसून येते.

३) राष्ट्रीय ’स्टियोपोरोसिस फाउंडेशनच्या आकडेवारीप्रमाणे ६ कोटी लोकांना या आजाराची लागण झाली आहे.

जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या आकडेवारी : भारतात याचे प्रमाण खूप मोठे आहे. झिरो फीगरच्या नादात १० पैकी ४ तरुणीत या रोगाची लक्षणे आढळतात.
कशी करावी चाचणी
बोन डेन्सिटी टेस्ट 🙁 BMD) या द्वारे चेक करु शकता आपली हाडाची मजबुती बोन डेन्सिटी टेस्टसाठी एका विशेष प्रकारच्या मशिनचा वापर होतो. या मशिनद्वारे अल्ट्रा साउंड लहरीचा वापर करत हाडाची घनता तपासली जाते. याद्वारे टाचेजवळीळ हाडाचे व हातांच्या हाडांचे स्क्रीनिंग करण्यात येते. या भागातील हाडांची डेन्सिटी पडताळली जाते. जेणेकरून हाडे ठिसूळ होऊन तुटण्याच्या आधी त्यांच्यावर उपचार सुरू करता येऊ शकतात. साधारणत: वयाच्या ४0 नंतर दर ३ वर्षानेे ही तपासणी करणे आवश्यक आहे.
या तपासणीच्या पुढील रीडिंग वरुण हाडाची घनता कळते.
ती अशी… – १ नार्मल हाडे – १ to – २ स्टिपेनिया (सुरुवात) – २ and above स्टियोपोरोसिस स्त्रीयांना जास्त धोकादायक : स्त्रियांची हाडे ठिसूळ होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते.
‘स्टियोपोरोसिसची कारणे : १) शरीरात असणारी कॅल्शियम व व्हिटॅमिन्स डी ची कमतरता २) थायरॉइडची समस्या एस्ट्रोजन व इती हार्मोन्सचा कमतरता वा बॅलन्स बिघडणे ३) शारीरिक हालचालींची, व्यायामाची कमतरता, अयोग्य आहार ४)धूम्रपान व मद्यपानामुळे हाडे ठिसूळ होतात.
स्टियोपोरोसिस लक्षणे : १) सामन्यात: ‘स्टियोपोरोसिस आजाराची लक्षणे ठळकपणे दिसून येत नाहीत. याचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांना फ्रॅक्चर. सामान्यत: माणसाची हाडे सहजासहजी मोडत नाहीत, परंतू या आजाराच्या प्रभावामुळे हाडे मोडतात, त्यामुळे याला फ्रेजाईल फ्रॅक्चर असे म्हणतात. असे फ्रॅक्चर जास्त करून खुबा व मनगटाची हाडे, हाडे अशा ठिकाणी होते. २) सुरुवातीला या रोगाची कोणतीच लक्षणे दिसून येत नसली तरी नंतर कमरेच्या खालचा हिस्सा व मानेजवळ दुखणे. ३) हिवाळ्यामध्ये हाडांचे दुखणे वाढणे, शारीरिक हालचालीस मर्यादा पडणे.
अशी घ्यावी काळजी : कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक का? हाडे ही कॅल्शियम ने बनली असतात हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शियम व फॉस्फेटचा वापर करते. कॅल्शियम ह्रदय, मेंदू व दुसऱ्या अवयवांसाठी देखील आवश्यक आहे. या अंगांचादेखील व्यवस्थित वापर करण्यासाठी पुन्हा शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते.
योग्य प्रमाणात शरीरात कॅल्शियम नसेल तर त्याचा परिणाम हाडे व टिशुवर होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ व लवकर तुटणारी बनतात. यासाठी वयाच्या ३० वर्षापर्यंत जेवणात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे कारण याच काळामध्ये हाडाचा विकास मोठ्या प्रमाणात होत असतो.
१) जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. जेवणामध्ये कॅल्शियम व विटॅमिन्स ‘डी’चा प्रामुख्याने समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, डेअरी प्रोडक्ट्स, मासे या घटकांमध्ये कॅल्शियम व व्हिटॅमिन्स ‘डी’ मोठ्या प्रमाणात असतात. तसेच सकाळच्या कोवळया उन्हात थोडया वेळात उभे राहिले तरीही शरीरात विटॅमिन्स ‘डी’ तयार होते.
२) रोजच्या आहारात ७०० मिलिग्रॅम कॅल्शियमचे सेवन करणे आवश्यक आहे.
३) शरीराचे वजन संतुलित ठेवणे आवश्यक आहे.
४) व्यायाम, योगा, करणे.
उपचार : या आजाराचे निदान झाल्यावर याचा उपचार तज्ज्ञ अार्थाेपेडिक डाॅक्टरच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. ‘स्टियोपोरोसिस’ या आजाराबाबत बरेच उपाय उपलब्ध आहे. रुग्णाला अॅलोपथीसोबत, काही आयुर्वेदिक औषध उपलब्ध आहे. व्हिटॅमिन्स ‘डी’, विशेषत: व्हिटॅमिन्स ‘डी’ ३ स्वरूपात देण्यात येते. व्हिटॅमिन ‘के २७’देखील बोन डेन्सिटी वाढविण्यास मदतगार सिद्ध होते. सिलेक्टिव एस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर सिरम थेरपीदेखील या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते.